शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बिळाशीत मुस्लिम युवकांनी केली गणेशाची प्रतिष्ठापना- हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श : वाजत-गाजत काढली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:29 IST

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील मुस्लिम युवक साहिल खुदबुद्दीन मुलाणी व शहारुख इब्राहीम मुलाणी यांनी घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श घालून दिला आहे.

ठळक मुद्देवाजत-गाजत काढली मिरवणूक

बिळाशी : बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील मुस्लिम युवक साहिल खुदबुद्दीन मुलाणी व शहारुख इब्राहीम मुलाणी यांनी घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श घालून दिला आहे.साहिल व त्याचे आजोबा अमिन मुलाणी व आजी दुल्हन मुलाणी यांचे गावाशी जिव्हाळ्याचे संबंध होते.

दसऱ्यावेळी व गावजत्रेवेळी अमिन यांची छडी ताशावर पडायची. भैरोबाच्या यात्रेत त्यांचे गुलाल, खोबरे, उदबत्तीचे दुकान देवाच्या दारात असतेच. लहानपणी साहिलने त्यांच्याकडे गणपती बसविण्याचा हट्ट केला. आजोबा व आजीने तो बालहट्ट आनंदाने पूर्ण केला. पांढरी शुभ्र विजार, शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी हयातभर घालणाºया अमिन यांची मशिदीवर जेवढी श्रद्धा, तेवढीच गणपती आणि ग्रामदैवत भैरवनाथावरही होती. आज ते हयात नाहीत, पण त्यांची प्रेमळ विचारधारा नातू चालवतो. साहिल रिक्षा चालवतो.साहिलचे वडील खुदबुद्दीन व चुलते इब्राहीम बाजारात मिठाईचा व्यवसाय करतात व एरवी जनावरांचा व्यापार करतात. ते गणेश मंडळांमध्ये सक्रिय असतात. भंडाºयावेळी सढळ हाताने मदत करताना,जेवण वाढण्यापासून ते पत्रावळ्या उचलण्यापर्यंत कामे आनंदाने करतात. घरी दहा दिवस मांसाहार पूर्ण वर्ज्य असतो. हिंदू-मुस्लिम ऐक्याला सांधणाºया या घटना मनाला उभारी देतात.हिंदू-मुस्लिम भाई-भाई!बिळाशी बंडातही बापू हसन मुलाणी अग्रेसर होते. त्यांचे बंधू रसूल व बापू उत्तम तबलावादक होते. रहिमान मुलाणी, आप्पाभाई मुलाणी, बाळूभाई मुलाणी हेदेखील तबलावादनात निष्णात होते. गावात कोठेही भजन असेल, तर तेथे विनामोबदला श्रद्धेने सेवा करीत असत. नुकतेच काही वर्षापूर्वी बाळूभाई यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांना टाळ-मृदंगाने शेवटचा निरोप दिला व भैरवनाथाच्या दारात शेवटचा कलाम त्यांच्यासाठी पढण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीGanpati Festivalगणेशोत्सव